Homeव्यापार / उद्योगकुडूस येथे ‘दैनिक आम संघर्ष टाइम्स’ कार्यालयाचे भव्य उद्घाटन

कुडूस येथे ‘दैनिक आम संघर्ष टाइम्स’ कार्यालयाचे भव्य उद्घाटन

कुडूस प्रतिनिधी / दि. 20 ऑक्टोबर
वाडा तालुक्यातील कुडूस येथे ‘दैनिक आम संघर्ष टाइम्स’ या वृत्तपत्राच्या नव्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वरिष्ठ पत्रकार आणि भिवंडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फारूक मेमन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी परिसरातील असंख्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहून ‘आम संघर्ष टाइम्स’ परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

‘दैनिक आम संघर्ष टाइम्स’ या वृत्तपत्राने आजवर अनेक सामान्य जनतेच्या न्यायासाठी लढा दिला असून, भ्रष्टाचाराविरोधात निर्भीडपणे आवाज उठवला आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध लढणारे हे वृत्तपत्र आता कुडूस येथून आपले कार्य अधिक जोमाने सुरू करणार आहे.

कार्यक्रमात पत्रकारांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, “आम संघर्ष टाइम्स हे नाव जसे धडाडीचे, तसेच याचे कामही परखड आणि जनतेच्या बाजूने राहिले आहे.”

या उद्घाटन सोहळ्याने कुडूस आणि परिसरातील पत्रकारितेच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular