वाडा (प्रतिनिधी):
कुडूस परिसरात पारंपरिक वारसा जपणारी बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यानिमित्त ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आपल्या गावाची शान, परंपरा आणि अभिमान” या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैलगाडा शर्यत रविवार, ३ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून स्पर्धा सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण कुडूस-कोंढले रोड, मांगाठणे, सापरांडे, ता. वाडा, जि. पालघर असे निश्चित करण्यात आले आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील पारंपरिक आणि रोमांचक खेळ जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📌 स्पर्धेचे नियम व अटी:
- सर्व स्पर्धकांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे…
शर्यतीदरम्यान सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे…
कोणत्याही प्रकारचे धोकादायक कृत्य आढळल्यास सहभागी रद्द करण्यात येईल…
वाद निर्माण झाल्यास आयोजकांचा निर्णय अंतिम राहील…
सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेणे बंधनकारक असेल…
या स्पर्धेचे आयोजन शेतकरी मंडळ कुडूस, कोंढले, दिनकरपाडा, मांगाठणे, सापरांडे, मोहोत्याचापाडा, उसर, नारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. गावाच्या परंपरेचा अभिमान जपत बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








