Homeक्राईममुसारणे फाट्यावर अपुऱ्या रस्त्यामुळे गंभीर अपघात

मुसारणे फाट्यावर अपुऱ्या रस्त्यामुळे गंभीर अपघात

मुसारणे फाट्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या अपूर्ण व निकृष्ट कामामुळे आज गंभीर अपघात घडला. रस्ता बनवण्याचे काम करणाऱ्या इंगल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात झाला. या दुर्घटनेत प्रसाद महाडीक (रा.कुडूस गळा कंपनी) यांचा पाय गंभीररीत्या तुटल्याची माहिती आहे.सदर ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले असून मोठे खड्डे, खचलेला कडा व उंचसखल भाग तसाच ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स अथवा सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नाही. अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असताना दुचाकी त्या खचलेल्या भागात घसरून ट्रकजवळ अडकली आणि हा अपघात घडला.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी प्रसाद महाडीक यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, नागरिकांनी यापूर्वीही या रस्त्याबाबत तक्रारी करूनही इंगल कंपनी व संबंधित प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.“हा अपघात अपघात नसून, रस्ता ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणाचा थेट परिणाम आहे,” अशी तीव्र संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. रस्ता दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद करणे, योग्य बॅरिकेड्स व चेतावणी फलक लावणे आणि दोषी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.स्थानिकांच्या मते, वेळेत उपाययोजना न केल्यास या ठिकाणी भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular