Homeराजकीयनिवडणूकीपूर्वी पालघर जिल्ह्यात १ ते ३ डिसेंबर ‘ड्राय डे’; मद्यविक्री पूर्णपणे बंद

निवडणूकीपूर्वी पालघर जिल्ह्यात १ ते ३ डिसेंबर ‘ड्राय डे’; मद्यविक्री पूर्णपणे बंद

पालघर, दि. 25 नोव्हेंबर:

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ निमित्त पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद तसेच वाडा नगरपंचायत क्षेत्रात तीन दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी हा आदेश पारीत करून निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकतेने पार पडण्यावर भर दिला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, १९४९ तसेच आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०२५ च्या आदेशानुसार संबंधित क्षेत्रांत मद्यविक्रीवरील बंदी लागू राहील.

ड्राय डेचे वेळापत्रक :

डिसेंबर — मतदानपूर्व दिवस : संपूर्ण दिवस सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या बंद

डिसेंबर — मतदानाचा दिवस : पूर्ण दिवस मद्यविक्री बंद

डिसेंबर — मतमोजणीचा दिवस : निकाल प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद

ही बंदी पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषदा व वाडा नगरपंचायत या सर्व ठिकाणी कठोरपणे अंमलात आणली जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी ड्राय डे दरम्यान नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कडक कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा दिला असून सर्वांनी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular