HomeBlog४० तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; गोपाळनगर, भिवंडी येथे मोबाईल दुकान फोडणारे दोन...

४० तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; गोपाळनगर, भिवंडी येथे मोबाईल दुकान फोडणारे दोन आरोपी जेरबंद

भिवंडी: गोपाळनगर परिसरातील एका मोबाईल दुकानात झालेल्या घरफोडी चोरीप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाणे यांनी अवघ्या ४० तासांत गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे.

या गुन्ह्यातील सुमारे ₹२३.४५ लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, त्यामध्ये महागडे मोबाईल फोन व इतर साहित्याचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. विशेष पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.

सदर कारवाईमुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular