HomeBlogपालघर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण दलामार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पालघर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण दलामार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पालघर :
उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, जिल्हा पालघर कार्यालयामार्फत आज (शनिवार, २७ सप्टेंबर २०२५) बोईसर विधानसभा क्षेत्रातील “स्वतंत्र सैनिक नरोत्तम लक्ष्मण पाटील माध्यमिक विद्यालय, सातिवली” येथे इयत्ता ७वी ते १०वीच्या ३५० ते ४०० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

पालघर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण दलामार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

प्रशिक्षणामध्ये मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन, प्रथमोपचार, विमोचन कार्यातील विविध गाठींचे प्रकार, कृत्रिम स्ट्रेचर तयार करण्याच्या पद्धती, आणीबाणीच्या वेळी जखमी व्यक्तींना उचलण्याचे उपाय, आग म्हणजे काय व आगीचे वर्गीकरण, नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण का आवश्यक आहे या विषयांवर व्याख्यान व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

हा उपक्रम उपनियंत्रक के. आर. कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय क्षेत्ररक्षक नरेश अनंत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली व कार्यालयीन अधिकारी अनंता पिरकर यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला. यावेळी विभागीय क्षेत्ररक्षक/मानसेवी निदेशक नरेंद्र सोलंकी, मास्टर ट्रेनर प्रिया पाटील, ज्योती मोरे, सुषमा जाधव, राहुल तामोरे यांचे मौल्यवान सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्याध्यापिका सौ. ठाकूर मॅडम व शिक्षकांच्या सहकार्याने अनंता पिरकर, नरेश म्हस्के, नरेंद्र सोलंकी व मास्टर ट्रेनर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या यशस्वी उपक्रमासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular