Homeराजकीयगावचा पाटील… आणि राज्याचा स्वप्नवत सम्राट!

गावचा पाटील… आणि राज्याचा स्वप्नवत सम्राट!

गावचा पाटील झाला की काही जणांच्या चालण्यातच फरक पडतो. चेहऱ्यावर आत्मविश्वासापेक्षा गर्व झळकतो. दोन रस्ते दुरुस्त झाले, एक सभा घेतली आणि आता जणू संपूर्ण राज्यकारभार आपल्या हातात आहे, असा त्यांचा सम्राटी भाव.

परंतु नेतृत्व हे फक्त पदावर बसण्यात नसतं; ते लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात असतं. शिक्षण, संयम आणि विनम्रता या गुणांशिवाय कोणतेही पद दीर्घकाळ टिकत नाही.
पण काही जण पद मिळालं की स्वतःला सर्वज्ञ समजतात.
कोणी त्यांच्यावर मत व्यक्त केलं, की लगेच वकिली सुरू…
“मलाच काय माहित नाही का?” “तुम्ही शिकवणार मला?”
अशी अहंकारी भाषा लोकांना दूर लोटते आणि नेता स्वतःच स्वतःपासून हरवतो.

जनतेची नजर नेहमी जागी असते. ती पाहते — कोण काम करतो आणि कोण फक्त दाखवतो. गर्वाने उभं राहिलेलं नेतृत्व हे वाऱ्याच्या झुळुकीने कोसळणारं वाळूचं मनोरे असतं.
जो नम्र असतो, तोच टिकतो. कारण सत्ता ही तात्पुरती असते, पण माणुसकी कायमची.

✍️ लेखक — डॉ. दिपेश पष्टे
समाजचिंतक, मानवाधिकार कार्यकर्ता.
मन:शांती, अध्यात्म आणि सामाजिक जाणीव यांवर कार्यरत.

RELATED ARTICLES

Most Popular