ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवात भाजपा वाडा तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची सहभागिता
वाडा/प्रतिनिधी
कुडूस, वडवली, कॅम्प, नारे आदी परिसरात पैगंबर मोहम्मद साहेबांचा जन्मदिन ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक मिरवणुका काढून मुस्लिम बांधवांनी आनंदोत्सव व्यक्त केला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील तसेच अमित शिर्के, उत्तम चौधरी, कल्पेश पाटील, कुडूस शहर प्रमुख विनोद जाधव व इतर कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजातील बांधवांना पुष्पगुच्छ अर्पण करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कुडूस, नारे, वडवली या भागांमध्ये दीर्घकाळापासून एक परंपरा आहे की गणेशोत्सव असो, दिवाळी असो किंवा रमजान-ईद – सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन सणाच्या शुभेच्छा देतात. हा सलोखा आणि आपसी भाईचारा हेच या भागाचे वैशिष्ट्य आहे.
या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी मंगेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच भविष्यातही हे प्रेम व एकात्मता कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.








