Homeमहाराष्ट्र राज्यज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

पुणे प्रतिनिधी/सुरज देवकर

पुणे : मजूर चळवळीचे प्रणेते, असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजकार्य क्षेत्रात आणि विशेषतः कष्टकरी व वंचित वर्गात शोककळा पसरली आहे.

डॉ. आढाव यांनी ‘हमाल पंचायत’, फेरीवाले, रिक्षाचालक, कचरावेचक आदी असंघटित कामगारांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजपरिवर्तनासाठी त्यांनी राबवलेल्या विविध आंदोलनांना वराज्यभरातून मोठा जनसमर्थन लाभला होता. “एक गाव एक पाणवठा” ही त्यांनी चालवलेली सामाजिक चळवळ आजही आदर्श मानली जाते.साधे, सरळ, नि:स्वार्थ्य कार्य अशा शब्दांत त्यांचा गौरव होत असे. सामाजिक समता, कामगारांचे अधिकार आणि मानवी मूल्ये यांसाठी लढलेल्या या थोर व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने समाजसेवा क्षेत्रात अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांच्या निवासस्थानी पार पडणार असून, विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

RELATED ARTICLES

Most Popular