वाडा प्रतिनिधी
कुडूस गावात दीपावलीच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना कुडूस विभाग, वाडा तालुका यांच्या वतीने भव्य ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाने परिसरातील नागरिकांना आनंद, उत्साह आणि संस्कृतीचा झंकार अनुभवायला मिळाला.कार्यक्रमात विविध संगीत सादरीकरणे, गीत-संगीत आणि दीपोत्सवाच्या सजावटींनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात प्रत्येक सादरीकरणाचे स्वागत केले.
हिंदू धर्मात दीपावली ही फक्त प्रकाशाचा नाही तर नव्या वर्षाच्या प्रारंभाचा आणि एकतेच्या भावनेचा प्रतीक मानली जाते. त्या परंपरेला चालना देत, या कार्यक्रमाद्वारे शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी समाजात ऐक्य, संस्कार आणि आनंदाचा संदेश दिला.कार्यक्रमावेळी शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरातील अनेक मान्यवर, तरुण आणि संगीतप्रेमींनी कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला.दिवाळीच्या झगमगत्या रात्रीत कुडूसमध्ये ‘दिवाळी संध्या’ ने खऱ्या अर्थाने उत्सवाचा प्रकाश उजळून टाकला!








