वाडा/डॉ.दिपेश पष्टे
वाडा पोलीस ठाण्यात एका अनोळखी वृद्ध महिलेची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद(रजिस्टर क्र.130/2025) करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय सुमारे 70 ते 75 वर्षे असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही.सदर प्रकरण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 अंतर्गत नोंदवले असून, पोलिसांनी वारसांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, नागरिकांकडून मिळणारी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल, आणि त्यासाठी कोणाकडेही या महिलेबाबत माहिती असल्यास पोलीस हवालदार/333 व्ही. एन. डुकले (मोबाईल: 8983378526) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.पोलीसांनी नागरिकांचे सहकार्य या प्रकरणात अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले आहे, जेणेकरून मृत महिलेच्या कुटुंबाला योग्य माहिती लवकर पोहोचवता येईल.








